माझी लाडकी बहीण योजनेच्या मुदतीत वाढ | Ladki Bahin Yojana 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Majhi Ladki Bahin Yojana) घोषणेपासून योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. परंतु पूर्वीच्या अर्ज करण्याच्या अडचणी व अल्प मुदतीचा विचार करून आता या योजनेचे निकष आणि अटी-शर्ती मध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं आता आणखी सहज आणि सोपं झालं आहे.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ? (Deadline To Apply Majhi Ladki Bahin Yojana?)
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरिता आता दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पूर्वी शासनानं मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती. परंतु अडचणी व अल्प कालावधी लक्ष्यात घेता लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये अथवा कोणीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित राहू नये म्हणून शासनाने या कालावधीत सुधारणा केली असून आता लाभार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्तींमधील बदल (Changes in Rules Of Majhi Ladki Bahin Yojana?)
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये पूर्वी होतं. परंतु आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
- २ लाख ५० हजार रुपये पर्णतचे उत्पन्न असणाऱ्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल, मात्र त्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी शिधापत्र असेल त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नसेल.
- पूर्वी लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष देण्यात आलेला होता मात्र आता सदरची वयोमर्यादा वाढविण्यात आलेली असून ती २१ ते ६५ वर्ष अशी करण्यात आली आहे.
- परराज्यातील महिलां असेल व पती महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणअत्तराची आवश्यकता असेल.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) आवश्यक कागदपत्रे :-
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचं प्रमाणपत्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) पात्रता :-
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- निवास: अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. (पती महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असेल तर परराज्यातील महिलां लाभ मिळण्यास पात्र असेल)
- वय: 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला ( विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला ) पात्र आहेत.
- उत्पन्न: वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- बँक खाते: अर्जदार महिलेकडे आधारशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
- वाहन : ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
- इतर लाभ : अन्य योजनेद्वारे आर्थिक लाभ दीड हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा.
वाचा आणखीन काही महत्वाच्या योजना
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2024 || लेक लाडकी योजना || स्वनिधी योजना – लहान विक्रेत्यांना प्रोत्साहन योजना || प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) || संजय गांधी निराधार पेन्शन योजना || पांढऱ्या रेशन कार्डधारकांना मिळणार ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Majhi Ladki Bahin Yojana ) FAQ :-
- योजना अंतर्गत कोण पात्र आहेत?
- वयोमर्यादा: 21 ते 65 वर्ष
- महाराष्ट्रात रहिवासी असणे आवश्यक
- विवाहित, विधवा, तलाकशुदा, परित्यक्त आणि निराश्रित महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
- वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
- योजनेच्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळेल?
- योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500.
- आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.)
- योजना अंतर्गत कोण अपात्र आहेत?
- वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त असलेले
- घरातील कोणी करदाता असल्यास
- सरकारी नोकरी किंवा पेंशन धारक
- कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास (ट्रॅक्टर वगळून)
- चार चाकी वाहन.
- अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील
Leave a Reply