माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 | MAZI KANYA BHAGESHRI SCHEME 2022 | GIRLS SCHEME IN INDIA
माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 | MAZI KANYA BHAGESHRI SCHEME 2022 | GIRLS SCHEME IN INDIA
दिनांक 1 एप्रिल 2016 पासून महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणाची खात्री देणे व मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे याकरिता राज्य सरकारने “माझी कन्या भाग्यश्री योजना” या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 महाराष्ट्र उद्देश (Objectives)
• लिंग निवडीस प्रतिबंध करणेकरिता उपाययोजना
• बालिकांचा जन्मदर वाढविणेकरिता उपाययोजना
• मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणेकरिता
• मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन व जीवनमानाबद्दल खात्री देणेकरिता
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळणारे लाभ (Benefits)
महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला असलेल्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना राज्यात सुरु करण्यात आलेली आहे, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अधिक लाभ देण्यात येणार आहेत,तसेच सदर योजना हि संपूर्ण महाराष्ट्रत राबविली जाणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना मध्ये 2 प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ मिळविता येईल .
1. लाभार्थी प्रकार 1मध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे
2. लाभार्थी प्रकार 2 मध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.तेव्हा दोन्ही मुलींना योजनेचा लाभ देय राहील, परंतु ज्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून नवीन निर्णयाप्रमाणे ज्या परिवारचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये पर्यंत आहे अशा कुटुंबास सदर योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे राहील.
• पहिल्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एका मुलीनंतर, मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 50,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव (Fixed Deposite) योजनेत गुंविण्यात येईल.
• तसेच यानंतर बँक खात्यामध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 50,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज(Intrest) मुलीला तिच्या वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
• पुढे पुन्हा मुद्दल 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज(intrest) वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
• त्यांनंतर पुढे पुन्हा 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज + मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
• कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल अशा कुटुंबास सदर योजना लागू असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल.अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळेल.
• दुसऱ्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये दोन मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून देय असलेली अनुदानाची रक्कम पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या नावाने प्रत्येकी रुपये 25,000/- 25,000/- याप्रमाणे एकूण ५०००० रुपये एवढी रक्कम दोन्ही मुलींच्या नावाने बँकेमध्ये मुदत ठेव (Fixed Deposit ) योजनेमध्ये गुंतविण्यात येईल.
• त्यानंतर बँके खात्यामध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले रुपये 25,000 रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज (interest ) मुलीला वयाच्या 6 व्या वर्षी काढता येईल.
• पुढे पुन्हा मुद्दल रुपये 25,000 मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज (interest ) वयाच्या 12 व्या वर्षी मुलीला काढता येईल
• त्यांनंतर पुढे पुन्हा 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज + मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या 18व्या वर्षी मुलीला काढता येईल.
USEFUL IMPORTANT LINKS
| PM KISAN SAMMAN NIDHI Yojana Registration | CLICK HERE |
| Maharashtra Agriculture Department | CLICK HERE |
| Pradhan Mantri Awas Yojana (Urban) | CLICK HERE |
| PM SVANidhi | CLICK HERE |
| PM UJWALA YOJANA | CLICK HERE |
माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र
1.लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र
2. मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र (Birth Certificate)
3.लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अथवा लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
4.अर्जदाराचे आधार कार्ड (Adhar Card)
5. BPL श्रेणी रेशनकार्ड (Ration Card)
6.मिळकत प्रमाणपत्र (Income Certificate)
7.अर्जदाराचे मोबाइल नंबर (Contact Number)
8.मुलीचे व मातेचे बँक पासबुक (Bank Passbook)
9.पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photographs)
वाचा आणखीन काही महत्वाच्या योजना
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2024 || लेक लाडकी योजना || स्वनिधी योजना – लहान विक्रेत्यांना प्रोत्साहन योजना || प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY)
Leave a Reply