लेक लाडकी योजना (महाराष्ट्र शासन ) | LEK LADAKI YOJANA 2023-2024

लेक लाडकी योजना (LEK LADAKI YOJANA)अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या सामाजिक आणि आर्थिक समावेशाने समृद्ध आणि समान भविष्य साध्यावे असे उद्दीष्ट साधण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून मुलीना उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगात समाविष्ट करण्याची प्रेरणा दिली जाणार आहे.अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून  विधानसभेत 2023-24 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये महिला सक्षमीकरणाकरिता घोषित  ‘लेक लाडकी योजना’  ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली.

लेक लाडकी योजना (महाराष्ट्र शासन ) | LEK LADAKI YOJANA 2023-2024

लेक लाडकी योजनेच्या (LEK LADAKI YOJANA) माध्यमातून मुलींना सशक्त व आत्मनिर्भर करण्यासाठी लहानपणापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शासनाकडून खालीलप्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते.

  • 1) मुलीच्या जन्मानंतर (after birth)पात्र कुटुंबाला रक्कम  5,000 रु. इतकी मदत आर्थिक सहाय्य म्हणून करण्यात येईल.
  • 2) मुलगी इयत्ता 1लीमध्ये जायला लागल्यानंतर शासनाकडून रक्कम 5,000 रु. आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
  • 3) मुलगी इयत्ता 6वीमध्ये जायला लागल्यानंतर शासनाकडून रक्कम  6,000 रु. देण्यात येतील.
  • 4)  मुलगी इयत्ता 11वीमध्ये शिक्षण घेत असेल, तर त्यासाठी शासनाकडून रक्कम  8,000 रु. देण्यात येतील.
  • 5) मुलीच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मुलीच्या शिक्षणासाठी (For Education Purpose)रक्कम 75,000 रु. देण्यात येतील.

वाचा आणखीन काही महत्वाच्या योजना:

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2024 | स्वनिधी योजना |  प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) | माझी कन्या भाग्यश्री योजना 2022

-: लेक लाडकी योजनेच्या (LEK LADAKI YOJANA) लाभार्थीसाठीच्या अटी व पात्रता :- 

  • 1)योजनेचा लाभ पिवळे किंवा केसरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना 
  • 2)मुलगी महाराष्ट्राची रहिवासी व जन्म महाराष्ट्रातच झालेलाी असावी

-: योजनेच्या लाभार्थीसाठी आवश्यक कागदपत्रे :- 

  • 1) जन्म दाखला (Birth Cerificate)
  • 2) मुलीचे आधार कार्ड (Adhaar card)
  • 3) मुलीचे बॅंकचे खाते व पासबुक किंवा आई-वडिलांचे बँक खाते व पासबुक (Bank Passbook )
  • 4) पिवळे किंवा केसरी  रेशन  कार्ड (Yellow/Orange Ration card)
  • 4) उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • 5) राहिवासी प्रमाणपत्र (Domicile certificate )
  • 6) दोन पासपोर्ट साईझ फोटो (Psssport size photographs)
  • 7) संपर्क क्रमांक (Contact number)

लेक लाडकी योजनेचा फॉर्म

लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा?

  • सर्वप्रथम लेक लाडकी योजनेचे फॉर्म डाउनलोड करा.
  • यानंतर तुमची माहिती भरा, जसे नाव, पत्ता, आधार कार्ड, जन्मतारीख इ.
  • त्यानंतर मुलाचे नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा.
  • त्यानंतर तुमची बँक माहितीही भरा.त्यानंतर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा लेक लाडकी योजनेच्या कार्यालयात जा आणि तेथे हा फॉर्म भरा.
  • आता तुमची आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत सबमिट करा.
  • यानंतर, तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल, आणि सर्व माहिती योग्य आढळल्यास, योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.

* लेक लाडकी योजना (LEK LADAKI YOJANA) अर्ज कसा करावा ? *

या योजनेची घोषणा केलीये  परंतु अद्याप या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल/ वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. योजनेचा लाभ घेणेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आपण माहिती देण्यात येईल.

USEFUL IMPORTANT LINKS

PM KISAN SAMMAN NIDHI Yojana RegistrationCLICK HERE
Maharashtra Agriculture DepartmentCLICK HERE
Pradhan Mantri Awas Yojana (Urban)CLICK HERE
PM SVANidhiCLICK HERE
PM UJWALA YOJANACLICK HERE

Author photo
Publication date:
Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *