इलेक्शन कार्ड नाही आत्ताच मोबाईलवरून इलेक्शन कार्ड बनवा

 

मित्रांनो  तुमच्याकडे इलेक्शन कार्ड नसेल आणि  तुम्हाला येत्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असेल तर आत्ताच तुमचे मतदान कार्ड बनवा.

 

इलेक्शन कार्ड्चे महत्त्व: 

                 लोकशाही समाजात प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असतो. तुमचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्याचा एक मूलभूत मार्ग म्हणजे निवडणुकीत भाग घेणे. तथापि, हा अधिकार प्रभावीपणे वापरण्यासाठी, मतदान ओळखपत्र (इलेक्शन कार्ड) म्हणून ओळखले जाणारे निवडणूक ओळखपत्र असणे महत्त्वाचे ठरते. निवडुकीद्वारे आपण लोकशाही प्रक्रियेत आपला प्रतिनिधी निवडून लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम बनवतो.
 

1. वैधता आणि ओळख:

इलेक्शन कार्ड हे सरकारद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज म्हणून काम करते जे तुमची ओळख आणि नागरिकत्व सत्यापित करते.
सरकारी योजनांसाठी अर्ज करणे, बँक खाती उघडणे इ. मतदानापलीकडे विविध कारणांसाठी ओळखीचा एक वैध प्रकार म्हणून तो मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जातो.
वैध इलेक्शन कार्डाशिवाय, अधिकृत व्यवहारांमध्ये तुमची ओळख सिद्ध करणे आव्हानात्मक असू शकते. तसेच तुमच्या मतदानाचा हक्क बजावण्यावरही निर्बंध येऊ शकतो म्हणून इलेक्शन कार्ड असणे खूप महत्वाचे आहे.
 

2. लोकशाही अधिकारांचा वापर:

निवडणुकीदरम्यान मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी निवडणूक कार्ड हे तुमचे तिकीट आहे.
हे सुनिश्चित करते की पात्र नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याची आणि निर्णय प्रक्रियेत योगदान देण्याची संधी आहे.
निवडणूक कार्ड धारण करून, तुम्ही तुमच्या समुदायाचे आणि देशाचे भविष्य घडवण्यात सक्रियपणे सहभागी होतात.
 

3. निवडणूक फसवणूक प्रतिबंध:

इलेक्शन कार्ड्समध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट असतात जी निवडणूक फसवणूक रोखण्यात मदत करतात, जसे की तोतयागिरी किंवा एकापेक्षा अधिक मतदान.
त्यामध्ये छायाचित्रे, बायोमेट्रिक डेटा आणि मतदार नोंदणी क्रमांक यांसारखे अद्वितीय ओळखक्रमांक असतात, ज्यामुळे व्यक्तींना मतदान प्रक्रियेत फेरफार करणे कठीण होते.
 

4. समावेश आणि प्रतिनिधित्व:

निवडणूक कार्ड मिळणे हे निवडणूक प्रणालीमध्ये समावेशकता आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
हे समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना त्यांचे हक्क सांगण्यास आणि शासनात आपले म्हणणे मांडण्यास सक्षम करते.
समान सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी, पात्र नागरिकांना निवडणूक कार्ड जारी करणे सुलभ करण्यासाठी सरकार आणि निवडणूक अधिकारी अनेकदा पुढाकार घेतात.
 

मित्रांनो इलेक्शन कार्ड बनवण्यासाठी खालील गोष्टी ध्यानात घ्या

 

  1. तुम्ही भारतीय नागरिक असावेत.
  2. तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  3. तुम्ही मतदान करून करणार असलेल्या मतदार संघ अथवा मतदान क्षेत्रातील सामान्यता रहिवासी असावे.
  4. मतदार म्हणून नोंदणी करण्यास अपात्र नसावे.
ऑनलाइन नवीन इलेक्शन कार्ड नोंदणी करण्यासाठी तुम्ही प्रथमता खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा अथवा प्ले स्टोअर वरून वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करा.  https://voters.eci.gov.in/
  •          

STEP 1 –  नवीन इलेक्शन कार्डसाठी अँप डाउनलोड केल्यानंतर अथवा खालील वेबसाईटवर गेल्यावर प्रथमत:जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केलेली नसेल तर NEW USER वर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांक व ईमेल क्रमांकाद्वारे नोंदणी करूखालील वेबसाईटवर नोंदणी करून घ्यान घ्या. नवीन नोंदणी केल्यानंतर पुन्हा तुमचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करा.

Step 2 – लॉगिन केल्यावर तुम्हाला खालील स्क्रीन बघावयास मिळेल. त्यानंतर Voter Registration पर्याय बटन दाबा.
तुम्ही फॉर्म क्रमांक 6 वर क्लिक करून नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकतात व आपली संपूर्ण माहिती खाली सांगितल्याप्रमाणे भरा

Lets Start पर्याय लीक केल्यानंतर तुम्ही या पर्यायावर क्लिक करून पुढे जा

Step 3 – 1. पुध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचे राज्य निवड उदारणार्थ तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर प्रथम महाराष्ट्र निवडा.

2. त्यानंतर तुमचा जिल्हा निवाडा उदारणार्थ मुंबई असेल तर मुंबई निवडा.

3. त्यानंतर तुम्ही राहत असलेला विधानसभा क्षेत्र निवडा.

4. तुमची जन्मतारीख टाका व जन्मतारीखसाठी आवश्यक कागदपत्र जोडा उदारणार्थ आधार कार्ड जोडायचे असेल तर आधार कार्ड जोडा व NEXT बटन दाबा.

वरील स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर NEXT CLICK करण्यापूर्वी संपूर्ण माहिती पडताळून घ्या

5. तुमचा पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.

6. त्यानंतर तुमचे नाव , आडनाव व आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करा.

7. तसेच त्यानंतर मोबाईल क्रमांक, ईमेल आईडीसमाविष्ट करा.

8.तुमच्या मध्ये काही Disability असल्यास पुढील disability पर्याय क्लिक करून पुध्ये जा

वरील स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर NEXT CLICK करण्यापूर्वी संपूर्ण माहिती पडताळून घ्या

9. तुम्ही तुमच्ये आई वडील अथवा पालकाचे नाव व आडनाव लिहून पुध्ये जा.

10. त्यानंतर तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता व पत्त्याच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडा. उदाहर्णार्थ आधार कार्ड

11.तुमचे आई वडील अथवा पालकांचे मतदार कार्ड असेल तर त्याचे नाव व त्यांच्यासोबत तुमचे नाते व त्यांचा मतदार कार्ड चा EPIC क्रमांक जोडून पुध्ये जा.

वरील स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर NEXT CLICK करण्यापूर्वी संपूर्ण माहिती पडताळून घ्या

12.शेवटची स्टेप Declaration भरताना तुमच्ये गाव शहर व दिनांक भरून done पर्यायावर क्लिक करा व त्यानंतर पुध्ये जा तुम्हाला प्राप्त REFERENCE क्रमांक जपून ठेवा.

पुढील ७-८ दिवसात तुम्हाला आवश्यक असल्यास तुमच्या जवळील मतदार कार्यालयातून मतदान अधिकारी संपर्क करून तुमचे कागदपत्रांच्या प्रति मगवतील अथवा तुमचे कार्ड तुम्हाला मिळेल.

तुम्ही तुमचे कार्ड ची माहिती DOWNLOAD EPIC या पर्यायवर क्लिक करून तुम्हाला प्राप्त झालेला REFERENCE क्रमांकाचे चे आधारे मिळवू शकता.

ELECTION CARD FOR NESSESSARY for VOTING

Author photo
Publication date:
Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *