डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र तुम्हाला माहित आहे का ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रील १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील इंदौर शहरावळील “महु” या गावी झाली. बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ-आंबेडकर असे होते. बाबासाहेवांचे वडीलांचे पुर्ण नाव रामजी माजोजी सपकाळ व आईचे नाव “भीमाबाई” असे होते. बाबासाहेबांचे वडील हे सैन्यामध्ये “सुभेदार” होते. बाबासाहेब हे त्यांच्या आई वडीलांचे १४ वे आपत्य होते. रामजी सपकाळ-आंबेडकर हे “कबीर पंथीय” होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासर्व मुलांना हिंदु साहीत्याबद्दल ओळख करुन दिली होतो. बाबासाहेब हे जातीने दलित होते. त्याकाळी भारतीय समजावर जातिव्यवस्थेचा पगडा असल्याने त्यांची जात ही अस्पृश्य जात मानली जात असल्याने त्यांना बालपणी अनेक संकटांना सामोरे जावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव ”सकपाळ” हुन ”आंबेडकर” कसे झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील “आंबावडे” हे होते. आंबेडकारांचे आवडते शिक्षक आंबेडकर यांच्या नावावरुन बाबासाहेबांचे आडनाव “सपकाळ” हुन “आंबेडकर” असे झाले. शाळेतील आंबेडकर या प्रेमळ गुरु बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या गुरुचे आंबेडकर हे नाव आंबेडकांनी स्विकारले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक आयुष्य.
१९०७ मध्ये मुंबई येथील “एल्फिस्टन हायस्कुल” मधुन आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश घेणारे ते “पहीले अस्पृश्य विद्यार्थी” होते. पुढे सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना केळुसकर या शिक्षकाच्या मदतीने २५ रुपयांची शिक्षवृत्ती सुरु केली. त्यातुनच आंबेडकरांनी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश केला.
- १९१३ मध्ये इंग्रजी व पर्शियन हे विषय घेवुन बाबासाहेब एल्फिस्टन कॉलेज मधुन बी. ए. उत्तीर्ण झाले. जानेवारी १९९३ मध्ये बडोदा संस्थानमध्ये आंबेडकरांनी कांही काळ नोकरी केली.
- १९९३ मध्ये बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरीकेतील “कोलंबिया” विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश केला.
- १९१५ मध्ये “प्राचीन भारतातील व्यापार” (Trade In Inciant India) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर करुन आंबेडकरांनी M.A. ची पदवी संपादन केली.
- १९१५ मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये दाखल केलेल्या “द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिकल अँड अँनलिटीकल स्टडी” या प्रबंधाबद्दल १९१७ मध्ये आंबेडकरांना Ph.D. ही पदवी मिळाली.
- १९१६ मध्ये आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. दरम्यान शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने आंबेडकर भारतात परत आले. याच वर्षी नोव्हेंबर १९१६ मध्ये जर्मनीतील “ग्रेज इन” विद्यापीठात वंरिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला य याच कॉलेज मधुन १९२३ साली आंबेडकर यांना “बॅरिस्टर” ही पदवी मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांना 32 पदव्यांसह 9 भाषांचे उत्तम ज्ञान होते.
- त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षांचा अभ्यास अवघ्या 2 वर्षे 3 महिन्यांत पूर्ण केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ‘डॉक्टर ऑफ ऑल सायन्सेस’ ही दुर्मिळ डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातले पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.
- पहिल्या महायुद्धामुळे त्यांना भारतात परतावे लागले. काही काळानंतर ते बडोदा राज्याचे लष्कर सचिव म्हणून काम करू लागले. परंतु तेथे अस्पृश्यतेबद्दल काही वाईट अनुभव आल्याने त्यांनी ती नोकरी सोडुन दिली व आंबेडकर हे मुंबई येथे येवून मुंबईमधील “वर्स कॉलेज” मध्ये अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा हे विषय शिकवु लागले.
- पुढे त्यांना सिडनम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.
- कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने ते पुन्हा एकदा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. १९२१ मध्ये इंग्लंड मधील लंडन विद्यापीठाची M.S.C. ही पदवी त्यांना प्राप्त झाली.
- १९२२ मध्ये “पॉब्लेम ऑफ रुपी” हा अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहील्यामुळे डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने D.S.C. ही पदवी बहाल केली.
- १९२४ मध्ये भारतामध्ये परतल्यावर आंबेडकरांनी कांही काळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकीली केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य
जानेवारी १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या सहाव्यामुळे आंबेडकरांनी “मुकनायक” हे पाक्षीक सुरु केले. मुकनायक या वृत्तपत्राचे प्रकाशक डॉ. आंबेडकर हे होते तर संपादक “देवराम विष्णु नाईक” हे होते व या पाक्षीकाच्या शिर्षक स्थानी “संत तुकाराम महाराजांची वचने” होती. तर बहिष्कृत भारत – १९२७ या वृत्तपत्राचे शिर्षक स्थानी संत ज्ञानेश्वरांची वचने होती.
आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांमध्ये नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती करणे या उद्देशाने “बहिष्कृत हितकारणी सभा” या संस्थेची स्थापना केली. महाडच्या सत्याग्रहानंतर ०३ एप्रील १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी “बहिष्कृत मेळा” हे वृत्तपत्र सुरु केले. या सभेचे ब्रीदवाक्य “शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा” हे होते.
१९२५ मध्ये आंबेडकरांनी अस्पृश्य मुलांसाठी “पहीले मोफत वस्तीगृह” काढले.
ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. १९ ते २० मार्च १९२७ या कालावधील रायगड जिल्हयातील “महाड” येथे बहिष्कृत हितकारणी सभेचे पहीले अधिवेशन डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. २० मार्च १९२७ रोजी आंबेडकरांनी अनुयायांसह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन अस्पृश्यतेविरद्ध पहिला सत्याग्रह केला. हा सत्याग्रह म्हणजे आंबेडकरांचा “अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला लढा” होय. याच काळामध्ये आंबेडकरांनी “आंबेडकर सेवा दल” ची स्थापना केली. पुढे या संस्थेचे नाव “समता सैनिक दल” असे करण्यात आले.
१९२७ मध्ये आंबेडकरांनी “समता संघ” ची स्थापना केली. या संघामार्फत १९२८ मध्ये “समता” व १९३० मध्ये “जनता” ही वृत्तपत्रे सुरु केली. १९५६ मध्ये “जनता” या वृत्तपत्राचे नामंकरण “प्रबुद्ध भारत” असे करण्यात आले.
२५ डिसेंबर १९२७ रोजी रायगड मधील महाड येथे आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या “मनुस्मृती” या हिंदु ग्रथांचे “दहन” केले. सदरचे दहन हे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण सहकाऱ्याच्या हस्ते केले.
२३ ऑक्टोंबर १९२८ रोजी डॉ. आंबेडकरांनी पुणे येथे “सायमन कमिशन” समोर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून साक्ष दिली व वयात आलेल्या सर्व स्त्री, पुरुषांना मताधिकार मिळावा अशी मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध गांधीजी
सन १९३० ते १९३२ दरम्यान मध्ये इंग्लंड येथे भरविण्यात आलेल्या तीनही गोलमेज परीषदेस अस्पृश्यांचे प्रतिनीधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. यावेळी आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघांची व दलितांना ” प्रोटेस्ट” चा दर्जा मिळावा अशी मागणी ब्रिटीश शासनाकडे केली होती. गोलमेज परीषदेमध्ये आंबेडकरांनी केली. त्याअनुशंगाने रॅमसेमेकडॉनल्ड यांनी १९३२ मध्ये जाहीर केलेल्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ ठेवण्यात आले होते. ब्रिटीश शासनाचा अस्पृश्यांना हिंदु मधुन अलग करण्याचा ब्रिटीश सरकारचा डाव लक्षात घेवुन. २० सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी यांनी पुणे येथील येरवडा जेल मध्ये प्राणंतिक उपोषण सुरु केले. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजीचे प्राण वाचविण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजीसह पुणे येथील येरवडा तुरुंगामध्ये महत्वपुर्ण करार केला. या करारान्वये दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याऐवजी १४८ राखीव जागांचा संयुक्त मतदार संघ देण्याची अट आंबेडकरांनी मान्य केली. याच करारास “पुणे करार” किंवा “येरवडा करार” किवा “ऐक्य करार” असे म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैवाहिक आयुष्य
एप्रिल १९०८ मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रामू उर्फ रमाबाई यांच्याशी झाला.
१९३५ मध्ये आंबेडकरांच्या पहील्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. पुढे १९४८ मध्ये डॉ सविता कबीर या ब्राह्मण महीलेशी आंबेडकरांनी दिल्ली येथे दुसरा विवाह केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय प्रवास
१९३५ च्या कायद्यान्वये होणाऱ्या तिनाष्हणुक लढविण्यासाठी १५ ऑगस्ट १९३६ रोजी आंबेडकरांनी “स्वतंत्र मजुर पेक्ष” या पक्षाची स्थापना केली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे १७ सदस्य निवडून आले
२३ आक्टोबर १९३५ रोजी आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील “येवले” येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परीषदेमध्ये “मी हिंद म्हणून जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणार नाही” अशी महत्वपुर्ण घोषणा केली.
१९४२ मध्ये औप्पा दुराय यांच्या विनंती वरुन, आंबेडकरांनी “ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाची स्थापना केली व या संघटनेचे अध्यक्ष म्हणुन एन. शिवराजन यांची नेमणुक केली. याच वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये या फेडरेशनने २२ पैकी १३ जागांवर विजय मिळविला. १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये आंबेडकरांना “मजुरु मंत्री म्हणुन नियुक्त करण्यात आले होते. सप्टेंबर १९४६ रोजीच्या हंगामी मंत्री मंडळात आंबेडकरांनी “कायदा मंत्री म्हणून नेमण्यात आले. • २९ ऑगस्ट १९४७ रोजी आंबेडकर यांना घटना समितीच्या “मसुदा समिती” चे अध्यक्ष बनविण्यात आले. मसुदा समिती मध्ये एन गोपालस्वामी, के. एम. मुन्शी, टि.टि. कृष्णामचारी व इतर असे एकुण ०७ सदस्य होते.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजो घटना स्विकृत करण्यात आली व २६ जानेवरी १९५० रोजी घटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. याच दिवशी भारत देश सार्वभौम झाला. आंबेडकरांच्या घटना तयार करण्याच्या अतुलनिय कार्याबद्दलच त्यांना “घटनेचे शिल्पकार” म्हणुन ओळखले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मातराबाबत घोषणा
१९३५ मध्ये धर्मातराबाबत घोषणा केल्यानंतर २१ वर्षे विवीध धर्माचा अभ्यास करुन गौतम बुद्धांच्या महानिर्वाणास २५०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल “विजयादशमी” च्या दिवशी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी आंबेडकरांनी महाराष्ट्रातील नागपुर येथे दिक्षा भुमीवर बोद्ध भिक्क्ष “चंद्रमणी महारथवीर” यांच्या बोद्ध धर्माची दिक्षा घेतली. नागपुर हे दलितांचे पूर्वज नाग लोकांचे वस्तीस्थान असल्याने मुंबई येथे धर्मातर करण्याचा निर्णय बदलून तो नागपुर येथे करण्याचा आंबेडकरांनी ठरविले.
महापरिनिर्वाण दिन
०६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचा मृत्यु दिल्ली येथे झाला. “महापरिनिर्वाण दिन” म्हणुन साजरा केला जातो. आंबेडकरांवर ०७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई मधील “दादर चौपाटी” येथे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. तेथील त्यांचे समाधी स्थळास “चैत्यभुमी” असे ओळखले जाते. • आंबेडकरांना भारताचे “आधुनिक मनु” म्हणुन ओळखले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पदव्या व सन्मान
- आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमीत्त १९९० मध्ये भारत शासनाने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देवुन त्यांचा गौरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले.
- ०५ जानेवारी १९५२ रोजी अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांना न्युयॉर्क येथे खास समारंभामध्ये L.L.D. ही पदवी बहाल केली.
- १९५३ मध्ये हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने L.L.D. ही पदवी बहाल केली.
- “आंबेडकर व फुले हे एका अर्थाने द्वंद्व समास आहेत” असे उद्गार डॉ. भालचंद्र फडके यांनी काढले. ० १४ एप्रील १९९० रोजी आंबेडकरांच्या जन्मशताब्दी दिनानिमीत्त भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च बहुमान “भारतरत्न” ने सन्मानित केले.
- तसेच १९९०-१९९१ हे आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष भारतामध्ये “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले.
- १९९१ मध्ये डॉ आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ” चवदार तळे सत्याग्रह” चित्र असलेले पोस्ट तिकीट प्रकाशित करण्यात आले.
- २००७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चेन्नई येथे “विधी विद्यापीठ” सुरु करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकारांची ग्रंथ संपदा :-
- १. रानडे, गांधी अँड जीना १९४३
- २. व्हॉट कॉग्रेस अँड गांधी हंब डन टु द अनटचेबलस् – १९४५
- ३. दि अनटचेबल्स- १९४६
- ४. थॉट्स ऑन पाकिस्तान – १९४८
- ५. द प्रॉब्लेम ऑफ रुपी
- ६. हु वेअर शुद्राज
- ७. कास्ट इन इंडिया
- ८. बुद्ध अँड हिज धम्माज् (मरणोत्तर प्रकाशित-१९५७/
- ९ . रिडल्स इन हिंदुजम
- १०. कास्ट इन इंडिया-प्रबंध
- ११. द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन
- १२. हु आर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स
- १३. अँनिहिलेशन ऑफ कास्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही तथ्य
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 9 भाषा अवगत होत्या.
- भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र बसवण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे ३२ पदव्या होत्या.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या २१ व्या वर्षी जवळपास सर्व धर्मांचा अभ्यास केला होता.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पीएचडी केली.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.
- डॉ.बाबासाहेबांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवली, परंतु दोन्ही वेळा त्यांचा पराभव स्वीकारावा लागला.
- डॉ.बाबासाहेबआंबेडकर हे हिंदू महार जातीचे होते, ज्यांना समाज अस्पृश्य मानत होता.
- डॉ.बाबासाहेब हे काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या कलम ३७० च्या विरोधात होते.
Leave a Reply