महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार-2024 : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आलेली असून हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा साहित्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानात यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीची निवड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाते. 1995 मध्ये जेंव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना करण्यात आली त्यावेळी प्राप्त व्यक्तीला 5 लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र दिले जात आसे. त्यानंतर 2012 मध्ये पुरस्काराचे बक्षीस रक्कम व निकष यामध्ये बदल करून पुरस्कार प्राप्त व्यक्तीला रोख रक्कम वाढवून 10 लाख रुपये एवढी करण्यात आली. 2023 मध्ये हीच रक्कम प्राप्त व्यक्तीला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता निकष:

  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती हि त्यांच्या क्षेत्रात अखंडपणे 20 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे कार्यरत असावी
  • एखाद्या संशोधनातून कोणत्याही क्षेत्रात नवा शोध लागला आणि एखाद्या खेळाडूला क्रीडाक्षेत्रात अनेक अव्वल पुरस्कार मिळाले असतील, तर या नियमात बदल करून त्या व्यक्तीबद्दल विचार केला जाऊ शकतो.
  • महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व्यक्तीच हा पुरस्कार प्राप्त करण्यास पात्र आहेत. परंतु आता महाराष्ट्रातील रहिवासी नसलेला परंतु १५ वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असणारा व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र असेल.
  • तसेच या पुरस्कारासाठी पद्म विजेत्यांना प्राधान्य दिले जाईल.

नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे?

  • प्रख्यात समाजसेवक, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 सालासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले आहे आणि डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थेची स्थापना केली आहे. जी पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि संरक्षण, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक या क्षेत्रामध्ये आपले कार्य बजावत आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2017 मध्ये पद्मश्रीनेही गौरविण्यात आले होते.
  • तसेच मराठी सिनेसृष्टीला संपूर्ण जीवन अर्पित करणारे आपले लाडके मामा श्री. अशोक सराफ यांना हि महाराष्ट्र शासनाने सन २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा स्थापना व इतिहास:

१९९५-९६ मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सरकार काळात या पुरस्काराची स्थान करण्यात आलेली होती. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु.ल. देशपांडे) हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी होते.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्याच्या आर्थिक मूल्यात अनेक बदल केले आहेत. 1996 मध्ये या पुरस्काराचे रोख 1 लाख रुपये होते. सध्या पुरस्काराचे स्वरूप ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे.

हा पुरस्कार विशिष्ट क्षेत्रामध्ये प्राविण्य प्राप्त तसेच महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. कला, क्रीडा, आरोग्यसेवा, उद्योग, पत्रकारिता, विज्ञान, समाजसेवा लोकप्रशासन यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जातो

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची निवड प्रक्रिया:

  • पात्र व्यक्ती, संस्था आणि संस्थांकडून नामांकने यांना महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी नामनिर्देशन अर्ज करावा लागतो व सादर चे नामनिर्देशन सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे तपासली जाते.
  • पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या उमेदवारांची यादी तयार करतात.
    नामनिर्देर्शित व्यक्तीचे त्या त्या क्षेत्रातील योगदान, उपलब्धी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील प्रभावाच्या आधारे मूल्यांकन केले जाते.
  • मूल्यांकनाच्या आधारे, समिती महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी अंतिम निवडीसाठी उमेदवारांची यादी महाराष्ट्र सरकारला शिफारस करते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते यादी:

महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्थापना झाल्यापासून आजपर्यंत पुरस्कार विजेत्यांची यादी

  • पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (1996)
  • लता मंगेशकर (1997)
  • विजय भटकर (१९९९)
  • सचिन तेंडुलकर (२००१)
  • भीमसेन जोशी (२००२)
  • अभय आणि राणी बंग (2003)
  • बाबा आमटे (२००४)
  • रघुनाथ अनंत माशेलकर (२००५)
  • रतन टाटा (२००६)
  • आर के पाटील (२००७)
  • डॉ. नानासाहेब धर्माधिकारी (2008)
  • मंगेश पाडगावकर (२००८)
  • सुलोचना लाटकर (२००९)
  • जयंत नारळीकर (2010)
  • अनिल काकोडकर (२०११)
  • बाबासाहेब पुरंदरे (२०१५)
  • आशा भोसले (२०२१)
  • अप्पासाहेब धर्माधिकारी (२०२२)
  • अशोक सराफ (२०२३)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष व सदस्य:

  • मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे या समितीचे अध्यक्ष असतात
  • सदस्य: सांस्कृतिक कार्य मंत्री
  • सदस्य: सांस्कृतिक कार्याचे मानद सचिव
  • सदस्य सचिव: माननीय सांस्कृतिक कार्य संचालक समितीचे सदस्य
  • समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या पाच अशासकीय सदस्यांचाही समावेश असतो.
  • या गैर-सरकारी सदस्यांची नियुक्ती त्यांच्या संबंधित क्षेत्रातील त्यांच्या कौशल्य आणि योगदानाच्या आधारे केली जाते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर टीका:

  • निवड प्रक्रिया पारदर्शक नाही अशी टीका यापूर्वी झालेली आहे.
  • पुरस्कार प्रदान करताना पक्षपाताचे होतो.
  • राजकीय दबावामुळे त्याचा प्रभाव पडत आहे.
  • काही पात्र उमेदवार त्यांच्या पात्रतेपासून मुकले आहेत.
  • लिंग आणि जातीच्या आधारावर पुरेसे वैविध्य नसल्याची टीका केली जाते.

Author photo
Publication date:
Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *